गंगापूर येथे दीपोत्सव, कौटुंबिक स्नेहमेळावा, संतोष कराळे, सीमा कराळे यांचा उपक्रम

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी): मुंबई येथे कार्यरत राज्याच्या शासकीय धोरणाचे सल्लागार तथा राजकीय रणनितीकार आणि गंगापूरचे भूमिपुत्र संतोष कराळे व त्यांच्या पत्नी सीमा संतोष कराळे यांच्या वतीने दिवाळी दीपोत्सव  राहणार आहे.

 गंगापूर विकास प्रतिष्ठानच्या सौजन्याने उद्या रविवारी (१९) येथे ऑक्टोंबर सायंकाळी ठीक ६:१५ वाजता, पांडुरंग लॉन्स, जामगाव रोड, आयोजित दीपोत्सव २०२५ या दिवाळी दीपोत्सव आणि आगळ्यावेगळ्या अशा विशेष कौटुंबिक स्नेहमेळाव्यास निशिगंधा वाड, हर्षदा खानविलकर, अशोक समर्थ या चित्रपट कलाकारांसह अनेक कलावंतांची उपस्थिती राहणार आहे.

शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर इतिहासात पहिल्यांदाच भव्य दीपोत्सव व कौटुंबिक स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला. प्रकाशपर्वाच्या शुभमुहूर्तावर आप्तेष्ट, स्नेहीजन व मित्रपरिवारासाठी आयोजित या कार्यक्रमाकरिता सिने अभिनेते अशोक शिंदे, कुशल बद्रिके, अभिनेत्री प्रिया बेर्डे, हेमांगी कवी, तन्वी किशोर, अक्षता सावंत यांची उपस्थिती विशेष आकर्षण ठरणार आहे. 

गंगापूर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी होत असलेल्या या पंचतारांकित कार्यक्रमाला विशेष नियमावलीसह केवळ निमंत्रितांसाठी प्रवेश असणार असून दिग्गज सेलिब्रिटींच्या उपस्थितीत शहरातील पांडुरंग लॉन्स येथे रविवारी सायंकाळी ठीक पाच वाजता या रंगतदार कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. दिवाळी हा सण आनंद, प्रकाश आणि एकतेचा संदेश देणारा आहे. 

या परंपरेला सामाजिक स्वरूप देत संतोष कराळे दाम्पत्यांनी आप्तेष्ट, स्नेहीजन, मित्रपरिवार, सामाजिक व राजकीय सहकारी यांना एकत्र येणार आहे. आणून कौटुंबिक स्नेहसंमेलनाचे आयोजन येणार आहे. कार्यक्रमात गंगापूर शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.